अंजनवतीत वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न
पंधरा दिवसात आठ जणांच्या आत्महत्या
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्याच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसात आठ जणांनी विविध कारणांवरून आत्महत्या केल्या. बीड तालुक्यातील समनापूर येथील एका महिलेने आत्महत्या केली आहे. तर अंजनवती येथील एका वृद्धाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्यास गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसांमध्ये नैराश्येचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे आत्महत्येच्या घटना मोठ्याप्रमाणात घडू लागल्या. राज्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात होऊ लागल्या आहेत. शेतकर्यांसह इतरही आत्महत्या करू लागले आहेत. समनापूर येथे योगिता बाबूराव भोसले (वय 25 वर्षे) या महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेून आत्महत्या केली. महिलेचे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अंजनवती येथील अंकुश चाळक या सत्तर वर्षीय वृद्धाने आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या पंधरा दिवसांमध्ये आठ जणांनी विविध कारणावरून आत्महत्या केल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आल्या.