पाटोदा ( रिपोर्टर): एका खासगी एटीएम कंपनीची 20 लाख 68 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एजन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मालकास विरुद्ध पाटोदा पोलिस इंडिया वन पेमेंट लिमिटेड कंपनीचे पाटोदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दोन एटीएम बसविण्यात आलेली आहेत हे दोन्ही एटीएम चालविण्याचा करार इंडिया वन पेमेंट लिमिटेड व माउली एजन्सीचे चालक सुधाकर सोले यांच्यामध्ये 10 जून 2021 रोजी करण्यात आला होता.
दरम्यान एटीएम पैशांअभावी बंद राहू नये म्हणून इंडिया कंपनीने 28 एप्रिल 2023 रोजी 19 लाख रुपये माउली एजन्सीचे चालक सुधाकर सोले यांच्या बँक खात्यावर पाठविले हाते.परंतु सोले यांनी एटीएममध्ये पैशांचा भरणाच केला आहे.तसेच एटीएममधील 1 लाख 68 हजार रुपये शिल्लक होते तेदेखील कंपनीस परत केले नाही. कंपनीने विचारणा केली असता चोले यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.सदर प्रकरणी कंपनीने नोटीस बजावूनदेखील एटीएममध्ये पैशांचा भरणा केला नाही. कंपनीची 20 लाख 68 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे एटीएम कंपनीच्या अधिकाराच्या निदर्शनास आले. त्यानंतर इंडिया कंपनीचे अधिकारी बापूसाहेब पाटील यांच्या तक्रारीवरून सुधारक दिलीप सोले रा.पारगाव घुमरा.ता. पाटोदा याच्या विरुद्ध पाटोदा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल पतंगे करीत आहेत.