माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर) : घरात एकटी असलेल्या एका 24 वर्षीय विवाहितेवर आत्याचार केल्याची घटना सात जून रोजी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी कोणाला काही सांगितले तर तुझ्या पतीला जिवे मारील अशी नराधमाने धमकी दिली होती. या प्रकरणी अखेर काल पिडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेली एक 24 वर्षीय विवाहीता 7 जून रोजी दुपारी एकटी घरी असतांना घरात अचानक मुरलीधर पटेकर (32) रा. टाकरवन हा आला. त्याने बळजबरीने विवाहीतेवर आत्याचार केला. या प्रकरणी कोणाला काही सांगितले तर जुझ्या पतीला जिवे मारण्याची धकमी पिडितेला दिली. याची माहिती पिडितेने आपल्या नंदेला दिल्यानंतर काल माजलगाव ग्रामीण पोलिस ठाणे गाठून पिडितेने तक्रार दिली. त्यावरुन आरोपी विरुध्द 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथकाच्या पीएसआय खुळे मॅडम करत आाहे.