तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर) हॉटेलची उधारी का देत नाहीस? असे कारण काढून तिघा जणांनी एकाला कोयत्याने मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आष्टी पोलिसात तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर बाजीराव खेडकर (वय 27, व्यवसाय-शेती, रा.सांगवी ता.आष्टी) यांनी आष्टी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि.17 जून रोजी सांगवी फाट्याजवळ बापू देवकते, मंगेश खेडकर, निखील महानोर (तिघे रा.पाडसिंगी) यांनी हॉटेलची उधारी का देत नाहीस? असे कारण काढून सांगवी फाट्यावर आडवून कोयत्याने डोक्यात वार केले. काठीने पोटावर मारून पाठीत मुक्कामार दिला व पाठलाग करून पुन्हा मारहाण केली. याप्रकरणी आष्टी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून कलम 324, 341, 323 भादवि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.