आष्टी पोलिसात गुन्हा दाखल
आष्टी (रिपोर्टर): पत्र्याचे शेड पाडून महिलेला जिवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण केल्याप्रकरणी आष्टी पोलिसात एकावर गुन्हा दाखल झाला असून धमकी देणार्या गावगुंडांचा तात्काळ बंदोबस्त करावा, आी मागणी पीडित महिलेने केली आहे.
गिता प्रकाश यादव (रा. मातावळी ता. आष्टी) यांनी आष्टी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील शहादेव आश्रुबा दराडे याने काल माझ्या घरी येऊन माझे पत्र्याचे शेड पाडून नुकसान केले व हे शेड पाडून घेत असे म्हणत शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी केली. शहादेव दराडे याच्यापासून आमच्या जीवीतास धोका असून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आष्टी पोलिसांकडे गिता यादव यांनी केली आहे. या प्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.