बीड (रिपोर्टर)- घरात कोणी नसल्याची संधी साधून कपाटातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 52 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना 29 सप्टेंबर रोजी रात्री दोनच्या सुमारास घोसापुरी येथे घडली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवराव जानकीराम जाधव या शेतकर्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या राहत्या गराचे मेनगेट तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील दोन्ही रुमचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने रोख रक्कम असा 52 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकररी बीड ग्रामीण पोलिसात कलम 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नाईक शिंदे हे करत आहेत.