मनोज जरांगे पाटील यांची मोरवडमध्ये एल्गार सभा
वडवणी (रिपोर्टर):- विदर्भ, खानदेश,प महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी प्रवर्गात आरक्षण दिल गेलं मग मराठवाठ्यातील मराठा समाजाने काय पाप केलं असा जाहिर प्रश्न उपस्थित करत समाजाला आरक्षण द्यावे वळवळ करायच नाही असा अप्रत्यक्ष सरकारवर मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.
मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांची एल्गार सभा आज वडवणी तालुक्यातील मोरवड याठिकाणी पार पडली आहे.जरांगे पाटील यांच जीसीबीच्या सहाय्याने फूलाची उधळण करत स्वागत केले.सुरुवातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच पुजन केलं. यावेळी व्यासपीठावर एकमेव मनोज जरांगे पाटील उपस्थित होते. तर हजारोच्या संख्येनी समाज बांधवाची देखील उपस्थिती होती. या एल्गार सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, अंतरवली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण करताना सरकारने अनेक डाव टाकले परंतु यामध्ये फसलो नाही.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शरीर स्वस्थ बसु देत नाही असं म्हणत मराठा आणि ओबीसीचे वरचे दोन चार नेते आरक्षण मिळू नये म्हणून मिस गाईड करत आहेत. आरक्षण लढ्याला ओबीसी समाजासह मुस्लिम आणि एसी व एसटी समाजाचा पुर्ण पाठिंबा आहे. आरक्षणामधले सरकारने डाव टाकयाचे थांबवावे आणि राज्यपालांच्या परवानगीने अधिवेशन घेऊन संविधानात टिकेल असे मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तसेच सरकारने आमच्याकडून वेळ घेतला आहे. त्या वेळेत आरक्षण मिळावे हि समाजाची भूमिका असून आयोग आणि सरकारचे सर्व निकष झाले आहेत.गायकवाड आयोगाने मागास ठरविले आहे.हैदरबाद मध्ये मराठा समाजाचे कुणबी म्हणून पाच हजार पुरावे सापडले आसताना आता कशाचे पुरावे हवे आहेत.आता सरकारने रज्यपालाच्या परवानगी सरकारने मराठा समाजाचा आरक्षणा बाबत कायदा पारित करावा यासाठी फक्त एक दिवस पाहिजे आहे. आम्ही 30 नव्हे तर 40 दिवस दिले आहेत.आता सरकारने कोणतीच वळवण न करता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा सरकारला हलवायची ताकद मराठ्याच्या पोरांमध्ये आहे.त्यामुळे मराठ्याच्या पोरांनी आत्महत्या करु नये आरक्षण भेटणारच असून चिंता करु नका सरकारने देखील लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणावर सही करावी असं मत यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
पाटील यांनी खुर्ची डावलली
सभेच्या व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील यांना एकमेव सोफा खुर्ची टाकली होती. परंतु जरांगे पाटील खुर्चीवर न बसता खाली बसले. खुर्चीची हवा माझ्या देखील डोक्यात घुसेल मग आरक्षण कसे भेटेल असं म्हणत मी खानदानी मराठा समाजातील शेतकऱ्याच्या रक्तातील पोरं आहे.असं म्हणत मराठा आरक्षण हेच ध्येय आहे आणि ते मिळणारच असं देखील मत व्यक्त केलं आहे.