बीड (रिपोर्टर)- आज पहाटेच्या दरम्यान परळी शहरातील बसस्थानकासमोर अज्ञाताकडून गोळीबार केल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येत असून या घटनेची माहिती परळी पोलिसांकडे उपलब्ध नव्हती. आमच्याकडे कुठलीही तक्रार नसल्याचे तेथील पीआयचे सांगणे होते.
परळी शहरातील बसस्थानकासमोर अज्ञाताने गोळीबार केला. दोन गोळ्या हवेत झाडल्या. ही गोळी पत्र्याच्या शेडमधून आरपार गेल्याचे सांगण्यात येते. गोळीबार कोणी व का केला? याची माहिती उपलब्ध नाही. याबाबत रिपोर्टरने परळी शहर पोलीस ठाण्याचे पीआय रवी सानप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कानावर हात ठेवत याबाबत आमच्याकडे काही तक्रार आली नाही, असे सांगितले, असे काही झाले याची कल्पना नाही मात्र याबाबत माहिती घेऊन सांगतो, असे सानप यांनी म्हटले.