Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमसार्वजनिक रस्ता अडवून शिवीगाळ करणार्‍यावर ऍट्रॉसिटी

सार्वजनिक रस्ता अडवून शिवीगाळ करणार्‍यावर ऍट्रॉसिटी


बीड (रिपोर्टर) सार्वजनिक रस्ता अडवून अतिक्रमण करत त्या रस्त्यावर ऊस लावून येणार्‍या-जाणार्‍याला अडवणूक करत जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात एकावर ऍट्रॉसिटी ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मनोज बबनराव साळवे (वय ३६ रा. फुले पिंपळगाव ता. माजलगाव) या शेतकर्‍याने माजलगाव ग्रामीर पोलीस ठाण्यात काल दिलेल्या फिर्यादीवरून हमीद हुसेन पठाण, समद हमीद खान पठाण, सलमान हमीद खान पठाण सर्व रा. फुले पिंपळगाव यांच्या विरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१५/२०२१ कलम ३४१, ४४७, ५०६, ३४ भा.दं.वि. सह कलम ३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत मनोज साळवे यांनी म्हटले आहे की, दि. २२ जुलै २०१३ पासून वरील लोकांनी रस्ता अडवला असून २९ डिसेंबर २०२१ रोजी या रस्त्याने मी जात असताना वरील लोकांनी संगनमत करून मला जातीवाचक शिवीगाळ केली व रस्त्याने जाऊ नको म्हणून अडवणूक केली, अशी फिर्याद दिलेली आहे

Most Popular

error: Content is protected !!