Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडदिल्ली आंदोलनाच्या समर्थनार्थ केंद्राच्या विरोधात बीडमध्ये आंदोलन

दिल्ली आंदोलनाच्या समर्थनार्थ केंद्राच्या विरोधात बीडमध्ये आंदोलन

नाकलगाव, नित्रूडमध्ये निदर्शने
बीड (रिपोर्टर)- केंद्र सरकारने कृषी विधेयक आणल्याने हे कृषी विधेयक रद्द करण्यात यावे यासाठी गेल्या आठ दिवसांपासून हरियाणा, पंजाबमध्ये लाखो शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. हे आंदोलन कॉ. नामदेव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले तर माजलगाव तालुक्यातील नाकलगाव, नित्रूड येथेही निदर्शने करण्यात आली.
    जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तिव्र निदर्शने झाली. या वेळ आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या आंदोलनात कॉ. नामदेव चव्हाण, अंबादास आगे यांच्यासह आदींची उपस्थिती होती तर नित्रूड येथे तलाठी सल्ला कार्यालयासमोर आंदोलन झाले. या वेळी कॉ सुभाष डाके, कॉ सय्यद रज्जाक, अ‍ॅड.अशोक डाके, जनक तेलगड, पांडुरंग उबाळे,रामा राऊत, माणिक काळे, बेग हमजा,नारायण तातोड़े, शेख हमीद, विकास डाके, कांता तेलगड यांच्यासह परिसरातील शेतकरी, शेतमजुर, युवक, महिला,विद्यार्थी उपस्थित होते.
 

nitrud

 नित्रूड येथेही दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन झाले. हे आंदोलन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुहास झोडगे  यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

 यावेळी नितीन झोडगे, दत्ता पवार, श्रीहरी काळे, सत्यप्रेम आतकरे, विकास गोडगे, परसराम गवळी, अजय दांगट, परमेश्वर शेळके, राजू झोडगे, लक्ष्मण सोळंके, दत्ता शेळके, हनुमान गवळी, मुंजा काळे, गोरख झोडगे, विजय झोडगे, शेख मासूम, कृष्णा शिंणगारे, राजाभाऊ काळे, रणजित पवार, माणिक शिंदे व गावातील विद्यार्थी,युवक, शेतकरी,कामगार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!