Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeक्राईमसोलेवाडी येथील शेतकर्‍यांवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न

सोलेवाडी येथील शेतकर्‍यांवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न

सोलेवाडी येथील शेतकर्‍यांवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न
आष्टी (रिपोर्टर):-तालुक्यामध्ये मागिल 8 ते 10 दिवसांपासून बिबट्याचे हल्ल्याचे सत्र सुरूच असून दि.29 रोजी पारगांव जोगेश्वरी येथील दोन महिलेवर हल्ला केला यामध्ये एक महिला जागीच ठार झाली या घटनेपासून 7 ते 8 कि.मी.अंतरावर असलेल्या सोलेवाडी येथे आज पुन्हा शेतात पाणी देत असलेल्या शेतकर्‍यांवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला यामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत.
   तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मागिल आठवड्यात तीन जणांचे बळे गेले आहेत.या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.17 पथके,विशेष पथके,रायफल क्लब टीम,शंभरावर कर्मचारी गांवकरी या बिबट्याच्या शोधात आहेत. मागिल आठ दिवसापासून ऐवढा मोठा फौजफाटा असताना देखील वनविभागाला हा बिबट्या गुंगारा देत असल्याने हल्ल्याचे सत्र सुरूच आहे.आज सकाळी पुन्हा 12 वाजण्याच्या सुमारास सोलेवाडी येथील शेतकरी विकास झगडे हे शेतात पाणी देत असताना बिबट्याने झडप घातली सुदैवाने झडप हुकल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत.घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी शाम सिरसाठ पथक व त्यांची टीम दाखल झाली असून बिबट्याचा शोध घेत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!