Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडखा. प्रितमताईंना मिळतायत हजारोंचे आशिर्वाद

खा. प्रितमताईंना मिळतायत हजारोंचे आशिर्वाद

saleem


बीडच्या पासपोर्ट कार्यालयामुळे आतापर्यंत २० हजार नागरिकांना पासपोर्ट मिळाले – सलीम जहॉंगीर
बीड (रिपोर्टर) लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामे करत असतांनाच सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील लोकांसाठी काही करता येणे ही खूप मोठी जबाबदारी अंतर्मनातुन पार पाडली जाते. ज्या कामासाठी मुंबईला जावे लागायचे, दोन दोन दिवस तिथेच थांबावे लागत, अनेक हेलपाटे मारावे लागायचे, वेळ आणि पैसा जाऊनही कामे होत नव्हती. नेमकी हीच अडचण जाणून घेत खा. प्रितमताई मुंडे यांनी बीडला पासपोर्ट कार्यालय आणले. या कार्यालयाच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल २० हजार नागरिकांनी पासपोर्ट मिळाले आहेत. यामुळे जिल्ह्याच्या दबंग खासदार प्रितमताईंना हजारो लोकांचे आशिर्वाद मिळतायत असे भाजप नेते सलीम जहॉंगीर यांनी म्हटले आहे.


बीड जिल्हावासियांनी आतापर्यंत वीस हजार पासपोर्ट बनवून घेतले आहेत. जिल्ह्यातील जनतेला शैक्षणिक कामाकरिता आणि हज उमरा तीर्थक्षेत्र याठिकाणी जाण्याकरिता पासपोर्टची अत्यंत आवश्यकता असायची. त्यासाठी मुंबई आणि पुण्याच्या चकरा घालाव्या लागत. मात्र बीडमध्ये झालेल्या कार्यालयामुळे त्या वाचल्या असून जिल्हा वासियांचे करोडो रुपयाची बचत झाली आहे. जनता खासदार प्रीतमताई मुंडे यांना आशीर्वाद देत असून त्याचा आनंद होत असल्याचे सलीम जहॉंगीर यांनी म्हटले आहे. बीडला पासपोर्ट कार्यालय व्हावे यासाठी सलीम जहॉंगीर यांनी खा. प्रितमताईंकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. बीड पासपोर्ट कार्यालय येथे पासपोर्ट मिशिंग आणि नूतनीकरण करण्यासाठी गेलो असता याबाबत माहिती मिळाली. पासपोर्ट कार्यालयात डाक घर आधिक्षक एस. एम. अली यांच्या मार्गदर्शनाखाली डाक सहाय्यक संजय देशमुख , बाबासाहेब जाधव हे कर्मचारी उत्कृष्टपणे काम करत असून जनतेला सेवा देत असल्याचे भाजप नेते सलीम जहॉंगीर यांनी म्हटले आहे.

Most Popular

error: Content is protected !!