बीड (प्रतिनिधी) बीड लोकसभा निवडणूक लढणार ही घोषणा केल्या नंतर डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी हालचाली सुरू केल्या. महा विकास आघाडी कडून निवडणूक लढवण्यास समर्थाता दर्शवली मात्र राष्ट्रवादी शप गटाकडून काल बंजरग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झाल्या नंतर डॉ.ज्योती मेटे काय भूमिका घेणार या कडे लक्ष लागले आहे. यात डॉ. मेटे या आज बीड मध्ये दाखल होणार आहेत.मात्र कार्यकर्ते डॉ. ज्योती मेटे यांनी निवडणूक लढवावी या भूमिकेत असल्याने त्यांचे जंगी स्वागत करण्याच्या तयारीत आहेत.
कला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांची उमेदवार जाहीर झाल्या नंतर डॉ.ज्योती मेटे या संभाजी नगर वरून गवेराई मार्गे बीड येथे येते आहेत. यात राक्षस भवन फाटा येथे कार्यकर्ते त्यांचे जंगी स्वागत करणार आहेत. तिथून जायकवाडी कॅम्प , बागपिंपळगाव , गेवराई , डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक गेवराई, पाडळशिंगी, पारगाव, महालक्ष्मी चौक या मार्गे बीड येथे दाखल होणार आहेत यावेळी ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.