Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडचालत्या वाहनाला अचानक पेट;जळुन खाक, जिवितहानी टळली

चालत्या वाहनाला अचानक पेट;जळुन खाक, जिवितहानी टळली


परळी (रिपोर्टर) लातुर येथील शो रुम मधुन आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करुन पुस मार्गाने परळी कडे येत असतांना नंदागौळ-पुस दरम्यान राञी 1 वाजण्याच्या सुमारास चालत्या किया नावाच्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने जळुन खाक झाली असुन गाडीतील प्रवासी माञ सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे.


या बाबत अशी माहिती मिळाली आहे कि,काल शुक्रवारी आपल्या किया गाडीची लातुर येथील शो रुम मधुन सर्व्हिसिग करुन परळी कडे राञी निघालेल्या गाडीने पुस ते नंदागौळ दरम्यान रस्त्यावर अचानक पेट घेतला आपल्या गाडीने पेट घेतल्याची चाहुल लागताच त्यातील प्रवाश्यानी परळी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला संपर्क साधला.लागलीच अग्निशामक पथकाचे प्रमुख सुनिल आदोडे व आपले सहकारी अमोल शिंदे,महेष कातकडे हे तात्काळ घटनेच्या दिशेने रवाना झाले.घटनास्थळी दाखल होण्यापुर्वीच गाडी जाग्यावरच जळुन खाक झालेली होती.तरीही अग्निशामक पथकाने पेट घेतलेल्या गाडीवर पाण्याच्या बंबने विझवण्याचा प्रयत्न करुन पेट आटोक्यात आणला.या गाडीत प्रवास करणारे अंदाजे तीन ते चार जण बचावले असुन कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी गाडीचे नुकसान झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!