Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeबीडडॉक्टर मिटिंगमध्ये, रुग्ण महिला ताटकळत बसल्या

डॉक्टर मिटिंगमध्ये, रुग्ण महिला ताटकळत बसल्या


नेकनूर (रिपोर्टर)- दर बुधवारी नेकनूरच्या स्त्री रुग्णालयामध्ये गर्भवती महिलांची मोफत तपासणी केली जाते, त्या अनुषंगाने आज अनेक महिला सकाळपासून रुग्णालयात दाखल झाल्या मात्र वैद्यकीय अधीक्षकांनी ऐनवेळी डॉक्टरांची बैठक बोलावली. ही बैठक तब्बल एक ते दोन तास चालल्याने महिलांना रुग्णालयाच्या दारात ताटकळत बसावे लागले. दुपारनंतर वैद्यकीय अधीक्षकांनी तपासणीला सुरुवात केली होती. ओपीडी संपल्यानंतर अधिकार्‍यांनी बैठक बोलावण्याऐवजी सकाळच्याच वेळेत बैठक बोलवल्यामुळे रुग्णालयामध्ये आलेल्या महिलांना काही तास ताटकळत बसण्याची वेळ आली.
नेकनूरच्या रुग्णालयामध्ये दररोज शेकडो रुग्ण उपचार घेतात. हे रुग्णालय भव्यदिव्य स्वरुपात बांधण्यात आले. विशेष करून महिलांच्या सुविधेसाठी रुग्णालय उभारण्यात आले. दर बुधवारी या रुग्णालयात गर्भवती महिलांची मोफत तपासणी केली जात असल्याने महिलांची बुधवारी मोठी गर्दी असते. आज सकाळपासून अनेक महिला चिठ्‌ठ्या काढून रांगेमध्ये उभ्या होत्या. मात्र वैद्यकीय अधीक्षकांनी सकाळीच सर्व डॉक्टरांची बैठक बोलावली त्यामुळे तपासणीला व्यत्यय आला. ही बैठक दोन तास चालल्याने इतका वेळ महिलांना रांगेमध्ये ताटकळत थांबावे लागले. ओपीडी संपल्यानंतर अधिकार्‍यास बैठक घेता येत नव्हती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!