दारू पिण्यास पैसे का देत नाही म्हणून वाद झाला होता ; वडवणी पोलिसात पतीविरोधात गुन्हा दाखल
वडवणी (रिपोर्टर):- पती हा दारु पिऊन येवून पत्नीला दारु पिण्यास पैसे का देत नाही अशी भांडणाची कुरापत काढली. तेव्हा पत्नी म्हणाली कि, मी तुम्हाला कुठून पैसे देणार असं म्हणताच पतीने शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी देत बाजुला पडलेल्या कोयत्याने उजव्या पायावर मारुन पत्नीला जखमी केले आहे. हि घटना मौजे उपळी येथे घडली असून पत्नीच्या फिर्यादीवरून पती विरोधात वडवणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडवणी तालुक्यातील उपळी येथील रहिवाशी असणार्या सुनिता सतीश पवार व सतीश केशव पवार हे दोघे नात्याने पत्नी व पती आहेत. पती सतीश पवार हे दारू पिऊन येऊन दारू पिण्यास पैसे का देत नाही अशी भांडणाची कुरापत काढली तेव्हा पत्नी सुनीता पवार म्हणाल्या की, मी तुम्हाला कुठून पैसे देणार असे म्हणतात पती सतीश पवार यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करून पत्नी सुनीता यांना जीवे मारण्याची धमकी दिली व बाजूलाच पडलेल्या कोयत्याने पत्नी सुनीता यांच्या उजव्या पायावर मारून जखमी केले आहे. ही घटना दि. 14 एप्रिल 1015 रोजी दुपारी 4 वाजता उपळी या ठिकाणी घडली आहे. जखमी झालेल्या सुनीता पवार यांनी उपचार घेतल्या नंतर दि.18 एप्रिल 2025 रोजी दुपारी वडवणी पोलीस स्टेशन येऊन पती सतीश केशव पवार यांच्या विरोधात विरोधात गु. र. नं. 91 /2025 कलम 118(1) 115(2), 352, 351(2), 351(3) भा.न्यास 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .तर आरोपी हा फरार आहे.
या प्रकरणाचा तपास सफौ. जायभाये करत आहेत.






