बीड, (रिपोर्टर) ः पाटोद्याहून जामखेडकडे निघालेल्या एका महिला कर्मचार्याच्या पर्समधून 57 हजार 300 रुपये काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. ही चोरी महिला चोरट्याने केली असून याप्रकरणी अज्ञात महिला आरोपी विरोधात पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मी भीमराव डफळ रा. जामखेड ता. जामखेड या शासकीय कर्मचारी आहेत. सदरील महिला जामखेडला जाण्यासाठी पाटोद्याहून एस.टी. बसमध्ये बसल्या होत्या. त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून 57 हजार 300 रुपये काढून आपल्या पर्समध्ये ठेवले होते. एस.टी.मध्ये बसल्यानंतर त्यांच्या बाजूलाच अनोळखी महिला बसली होती. या अनोळखी महिलेने डफळ यांच्या पर्समधील 57 हजार 300 रुपये काढून घेतले. हा प्रकार महिलेच्या निदर्शनास आल्यानंतर या महिेलेने पाटोदा पाोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी अज्ञात महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





