48 हजार रुपये रोख पळवले
शिरूर, (रिपोर्टर) ः घाटशिळ पारगाव येथे काल नारळी सप्ताहाची सांगता होती. या सप्ताहाला गावातील सर्व लोक गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने एका घराचे कुलूप तोडून घरातील नगदी 48 हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शिरूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे काल संत वामनभाऊ महाराज यांच्या नारळी सप्ताहाची सांगता होती. या सप्ताहाला सर्व गावातील नागरिक गेले होते. याच संधीचा फायदा उचलून अज्ञात चोरट्याने बाबासाहेब नवनाथ खेडकर यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत घरातील नगदी 48 हजार रुपये चोरून नेले. परत आल्यानंतर खेडकर यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी खेडकर यांनी शिरूर कासार पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





