तलवाडा पोलिसांनी ट्रॅक्टरसह केनी जप्त केली
गेवराई, (रिपोर्टर) ः गोदावरी नदीच्या पात्रातील लिंबगाव शिवारातून वाळूचा उपसा होत आहे. सदरील वाळू एका ट्रॅक्टरव्दारे घेऊन जात असल्याची तलवाडा पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ट्रॅक्टर व केनी जप्त केले. या दोन्ही वाहनांची किंमत 5 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लिंबगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रातून वाळूचा उपसा होत असल्याची माहिती तलवाडा पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्याठिकाणी एम.एच.23 डी.7792 क्रमांकाचा ट्रॅक्टर आढळून आला. त्याचबरोबर वाळू उपसणारी एक केनीही आढळून आली. हे दोन्ही वाहने पोलिसांना आढळून आले. या दोन्ही वाहनाची 5 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. हे वाहने जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या फिर्यादीवरून सोपान शिवाजी शिंदे रा. तपेनिमगाव ता. गेवराई याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






