अंबाजोगाई (रिपोर्टर): शहरातील नागझरी परिसरात असलेल्या तलावात आज दुपारी महिलेचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.
नागझरी परिसरातील साठवण तलावात महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणला होता. महिलेची दुपारपर्यंत ओळख पटली नव्हती.










