
परळी (रिपोर्टर): संभाजीनगर पोलीसांनी वेगवेगळ्या कंपनीचे गहाळ झालेल्या 9 मोबाईलचा शोध घेवुन तक्रारदार नागरीकांना परत केले.
संभाजीनगर पोलीस ठाण्यात नागरीकांचे मोबाईल गहाळ झाले बाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी पो.नि.धनंजय ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रीक विश्लेषणाद्वारे पोअं. खाडे यांनी शोध घेतल्यानंतर वेगवेगळ्या कंपनीचे एक लाख रुपये किंमतीचे गहाळ मोबाईल अभिजीत धोंडीराम मुंडे रा.साकुड,लक्ष्मण दडगे रा. बजरंगनगर परळी,रविंद्र बनसोडे रा. लिंबुटा,अमोल गर्जे रा. टी. पी.एस. कॉलनी लातुर,अमोल कुलकर्णी रा. हेळम,सुदाम खाडे रा. होळ,जिवन सुरवसे रा.परचुंडी,नितीन डापकर रा.बेलंबा,रोहित स्वामी रा. विद्यानगर या तक्रारदार नागरीकांना परत केले.पोउपनि जाधव,शिंदे,व्यंकटी खाडे,शंकर डोंगळे,विक्की सुरवसे यांनी केली.









