मस्साजोग (रिपोर्टर)- केज तालुक्यातील बेलगाव येथील ग्रामपंचायतच्या बोगस झालेल्या कामांबद्दलची तक्रार आणि वर्तमानपत्रातून आवाज उठवत माहिती अधिकार टाकल्यामुळे प्रताप दातार यांना बेलगाव येथील माजी सरपंचाने मारहाण केल्याची घटना आज सकाळी घडली. या प्रकरणी दुपारी एक वाजेपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
प्रताप दातार हे गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू उपश्यासह अन्य बोगस कामांविरोधात आवाज उठवत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी केज तालुक्यातील बेलगाव येथील ग्रामपंचायतीच्या बोगस कामाबद्दल मीडियामधून आवाज उठवत माहिती अधिकार टाकला होता. याचा राग धरत माजी सरपंच खंडुराव चौरे यांनी आज दातार यांना काठ्यांनी बेदम मारहाण केली.
याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून दातार यांनी मदत मागितली. काही पत्रकारांनी केज पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली तेव्हा पोलिसांनी संबंधित पत्रकारांना घटना माहित झाली आहे, घटनास्थळी गाडी पाठविली, असे सांगितले. या प्रकरणी दुपारी एक वाजेपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.