बीडमध्ये सर्वाधिक 23 बाधीत
बीड (रिपोर्टर)- कोरोना रोज कमी जास्त प्रमाणात आपले डोके वर काढतोय, आज आलेल्या 673 संशयितांमध्ये बीडमध्ये तब्बल 23 पॉझिटिव्ह आढळून आले असून जिल्ह्यात 35 रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभागाला आज दुपारी सव्वाबारा वाजता प्राप्त झालेल्या 673 जणांच्या अहवालामध्ये 638 जण निगेटिव्ह आले असून 35 जण बाधीत आढळून आले आहेत. यामध्ये गेवराई, केज, माजलगाव, परळी तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला तर अंबाजोगाई 6, आष्टी 2 आणि सर्वाधिक रुग्ण हे बीड तालुक्यात आढळून आले आहेत.