Friday, January 22, 2021
No menu items!
Home बीड माजलगाव न.प.चा कारभार आंधळं दळतयं अन् कुत्र पिठ खातयं

माजलगाव न.प.चा कारभार आंधळं दळतयं अन् कुत्र पिठ खातयं


इतिहासात पहिल्यांदाच वर्षभरात झाले तिन नगराध्यक्ष,
चार सिओ बदलून गेले माजलगावचा विकास शुन्य,

भ्रष्टाचार प्रकरणात अनेक कर्मचारी,
नगराध्यक्ष, मुख्याधिकारी जेलमध्ये

माजलगाव (रिपोर्टर)- कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेल्या माजलगाव नगर पालिकेचा मागील एक वर्षांचा विकास म्हणजे आंधळं दळतयं अन् कुत्र पिठ खातयं अशी परिस्थिती झाली असुन नगर पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच तिन नगराध्यक्ष झाले अन् बदलले एवढेच काय पण कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नव्हता त्यामुळे चार सिओ देखिल उंटावरून शेळ्या राखत कारभार पाहत होते. त्यामुळे पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि तो उघड झाल्याने अनेक कर्मचारी, नगराध्यक्ष, सिओ जेलमध्ये गेले. एवढ्या कालावधीत माजलगावचा विकास मात्र शुन्यावर गेला.


2016 साली जनतेतुन नगराध्यक्ष म्हणुन सहाल चाउस हे मोठ्या मताधिक्याने निवडुण आले. अतिशय अटीतीटीच्या झालेल्या निवडणुकीत तत्कालिन आमदार आर. टी. देशमुख, तत्कालिन पालकमंत्री पंकजा मुंडे, भाजपा नेते मोहन जगताप यांनी चाउस यांच्या जनविकास आघाडी भाजपा पुरस्कृत केले आणि त्यांनी नगराध्यक्ष म्हणुन सहाल चाउस यांना पाठींबा देत पालिकेत भाजपा पुरस्कृत जनविकास आघाडीची सत्ता आणली. तत्कालिन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पालिकेला मोठा निधी दिला परंतु स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे कुठलेही विकास काम झाले नाही. शहराच्या मुख्य रस्त्यावर वृक्ष लागवडीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी वापरल्याचे पालिकेने दाखवत मोठा अपहार केला.

त्याचबरोबर शहरातील विवीध रस्ते, नाल्या, लिकेज दुरूस्ती यामध्ये देखिल भ्रष्टाचार केल्याचे उघड झाल्याने तत्कलिन नगराध्यक्ष यांना जेलमध्ये जावे लागले. त्यांचेबरोबर लेखापाल, मुख्याधिकारी आणि अन्य कर्मचारी अद्यापही जेलमध्ये आहेत. या सर्व कार्यकाळात माजलगावचा विकास पाच वर्षे मागे गेला. सतत तिन महिणे गैरहजर असल्याच्या कारणावरून जिल्हाधिका-यांनी नगराध्यक्ष पद बरखास्त केले. त्यामुळे काही काळ नगराध्यक्ष पदाचा कारभार सौ. सुमनबाई माणिकराव मुंडे यांनी सांभाळला त्यानंतर महाराष्ट्ात माजलगावच्या नगर पालिकेत पहिल्यांदा नगरसेवकातुन नगराध्यक्ष शेख मंजुर यांना नगराध्यक्ष करण्यात आले. ही सर्व प्रक्रिया होण्यासाठी मागील वर्षभराचा कालावधी गेला आणि माजलगाव शहराचा विकास मात्र शुन्यच राहिला. असे असले तरी पालिकेकडे मात्र राजकीय नेत्यांचे देखिल दुर्लक्षच राहिले.

पालिकेचा कारभार चालतो एका शादीखाण्यात
मागील बारा वर्षांपूर्वी 2008 ला पालिकेच्या इमारतीसाठीच्या जागेचे भुमिपुजन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, स्व. आर. आर. पाटील यांच्या हस्ते व आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत झाले होते. कोट्यावधी रूपयांच्या निधीतुन बिल्डींग तयार होउन दोन वर्षे झाले परंतु किरकोळ कामामुळे पालिकेचा कारभार एका शादीखाण्यात चालते आहे. ही एक माजलगावच्या सर्वपक्षीय नेत्यांसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. याकडे आमदार महोदयांनी लक्ष दिले तर 2021 मध्ये तरी माजलगाव नगर पालिकेला अच्छे दिन येतील.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

बीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव

बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आज दुपारी जाहीर करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक यांची तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव यांची...