औरंगाबाद (रिपोर्टर); बीड जिल्ह्यातील बहुतांश कारखाने इतर जिल्ह्यातील ऊस गाळप करीत असून गेटकेन पद्धतीचा ऊस आणणे बंद करण्यात यावे, मराठवाड्यातील ऊसाला पश्चिम महाराष्ट्राच्या धरतीवर भाव देण्यात यावा यासह इतर मागण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने औरंगाबादच्या प्रादेशिक सहाय्यक संचालक कार्यालयाच्या समोर बोंब मारो आंदोलन करण्यात आले. शेतकरी कार्यालयाला कुलूप ठोकण्यास गेले होते मात्र पोलीसांनी त्यांना रोखले. हे आंदोलन गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली झाले. माजलगाव तालुक्यातील कारखानदार इतर जिल्ह्यातून ऊस आणून गाळप करत असल्याने स्थानिक ऊस उत्पादक शेतकर्यांचे नुकसान होवू लागले आहे. बाहेरचा ऊस आणणे बंद करावा, 265 ऊसाची नोंदणी करण्यात यावी, ऊसाला पश्चिम महाराष्ट्राच्या धरतीवर भाव देण्यात यावा यासह इतर मागण्यासाठी प्रादेशिक सहायक संचालक (साखर कार्यालयाच्या समोर) शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बोंबा मारो आंदोलन केले. शेतकर्यांनी कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता मात्र पोलीसांनी शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात गराडा घालून त्यांना रोखण्यात आले. हे आंदोलन भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात बीडचे बहुतांश शेतकरी सहभागी झाले होते.
बीडच्या शेतकर्यांनी औरंगाबादमध्ये सहसंचालक कार्यालयासमोर बोंबा ठोकल्या
0
443
RELATED ARTICLES
आयुक्त सुनिल केंद्रेकरांचा बाजार नेटकर्यांनी घेतला डोक्यावर, म्हणाले रियल हिरो
बीड (रिपोर्टर)
बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा औरंगाबादचे आयुक्त सुनिल केंद्रेकर यांचे चार फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत असून...
केंद्राची पीक पाहणी म्हणजे ‘बैल गेला, झोपा केला’
औरंगाबाद जिल्ह्यात पीक पाहणीला सुरुवात, चार महिन्यापूर्वी उद्ध्वस्त झाले खरीपाचे पीक आता शेतात पहायला काय मिळणार, २६ लाख हेक्टरमध्ये नुकसान झाल्याची अधिकृत...
त्या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घातल्या, बिबट्या ठार
बीड -ऑनलाईन रिपोर्टर
जालना, औरंगाबादपासून ते बीड व नगरनंतर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात गेले...
Most Popular
पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह
पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....
आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद
अवैध पिस्टल बाळगणार्यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...
अग्रलेख- महागाईत तेल
गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...
दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण
बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...