नेकनूर (रिपोर्टर)-मांजरसुंबा महामार्गावर एका दुचाकी-स्वारास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली होती. या अपघातात सदरील इसम जखमी झाला होता. जखमी अवस्थेत इसम जागेवरच पडून होता. घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे जखमीचे प्राण वाचले.
विक्रम लिंबाजी धायगुडे (रा. बार्शीनाका, बीड) यांचा मांजरसुंबा महामार्गावर अपघात झाला होता. त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. जखमी अवस्थेत धायगुडे रस्त्यावर पडून होते. घटनेची माहिती महामार्ग पोलिस नाईक, लक्ष्मण मुंडे, फुलचंद जाधव, अल्ताफ शेख यांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीस ऍम्ब्युलन्सद्वारे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी वेळीच सतर्कता बाळगून अपघातातील जखमीस रुग्णालयात दाखल केल्याने जखमीचे प्रार वाचले.