
तहसीलदारांनी लक्ष द्यावे, राशन वाटप का केले नाही याचा जाब विचारावा
बीड (रिपोर्टर): बीड शहरासह ग्रामीण भागामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून राशनचा माल वाटप करण्यात आलेला नाही. सध्या सणासुदीचा कार्यकाळ आहे. या दिवसात तरी राशनवाटप करायला हवे होते. परंतु अजूनही राशन वाटप झाले नसल्याने तहसीलदारांनी याची दखल घेत संबंधित राशन दुकानदारांना याबाबत जाबविचारावा आणि तात्काळ राशन वाटप करण्याचे आदेश राशन दुकानदारांना द्यावेत, अशी मागणी कार्डधारकांकडून केली जात आहे.
बीड शहरासह ग्रामीण भागात अनेक गोरगरीब कार्डधारक आहेत. या कार्डधारकांना नियमितपणे राशन वाटप केले तरच त्यांच्या घरात धान्य येते. गेल्या दोन महिन्यांपासून राशन दुकानदारांनी धान्याचे वाटप केलेले नाही. सध्या सणासुदीचा कार्यकाळ आहे. या दिवसात तरी राशन वाटप व्हायला हवे होते. बीड तहसीलदार आणि पुरवठा विभागाने राशन संदर्भात गांभीर्याने घेऊन राशन वाटप करण्याचे सक्तीचे निर्देश संबंधित राशन दुकानदारांना द्यावेत, अशी मागणी केली जात आहे. राशनचा माल दुकानदाराने उचलला आहे का? आणि उचलला असेल तर त्याचे वाटप झाले का नाही? याचा जाब प्रशासकीय अधिकार्यांनी संबंधित राशन दुकानदारांना विचारायला हवा.
000






