संभाजीनगर (रिपोर्टर): रात्री राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले योगेश क्षीरसागर यांनी आज सकाळी संभाजीनगर येथे पक्ष कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या वेळी त्यांच्या सोबत शुभम धूत हे उपस्थित होते.
आज सकाळी योगेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीमधून बाहेर पडण्याचे कारण स्पष्टपणे सांगितले होते. पक्षप्रवेश आणि उमेदवारांची घोषणा लवकरच करणार असल्याचे म्हटले होते. नऊची पत्रकार परिषद झाल्यानंतर योगेश क्षीरसागर हे संभाजीनगरसाठी रवाना झाले. त्याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहेत. योगेश क्षीरसागर यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संभाजीनगर येथील भाजपाच्या पक्ष कार्यालयामध्ये झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये डॉ. योंगेश यांनी पक्षप्रवेश केला. त्यावेळेस त्यांच्या समवेत शुभम धूत उपस्थित होते














