Tuesday, January 26, 2021
No menu items!
Home बीड सीईओ कुंभार यांनी जिल्हा रुग्णालयात केला शुभारंभ

सीईओ कुंभार यांनी जिल्हा रुग्णालयात केला शुभारंभ


बीड/वडवणी/परळी (रिपोर्टर)- केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यात २५ महापालिका क्षेत्रात कोरोना लसीकरणाचे ‘ड्राय रन’ प्रात्यक्षिक केले जात असून आज बीड जिल्ह्यात तीन ठिकाणी हे प्रात्यक्षिक करण्यात आले. बीड जिल्हा रुग्णालय, वडवणी आणि परळी येथे प्रत्येकी २५ जणांवर हे प्रात्यक्षिक करण्यात आले असून आज सकाळी जिल्हा रुग्णालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते या प्रात्यक्षिकाचा शुभारंभ करण्यात आला. कोरोनाची लस या महिन्यात केव्हाही येऊ शकते, त्यासाठी हे प्रात्यक्षिक केले जात असून लस योग्य वेळेत लोकांना देता यावी यासाठी हे प्रात्यक्षिक असल्याचे सांगण्यात येते.
कोरोना बाबतच्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना लसीकरणाचे दुसर्‍या टप्प्यातील ड्राय रन हे महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये आज यशस्वीरित्या पार पडले. बीड जिल्ह्यात तीन ठिकाणी ड्राय रनचे प्रात्यक्षिक आज सकाळी केले गेले. जिल्हा रुग्णालयात ड्राय रनचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार, डॉ. शल्यचिकित्सक गित्ते यांच्या उपस्थितीत फित कापून झाला. बीडमध्ये २५ लाभार्थ्यांची या वेळी निवड करण्यात आली होती. तशी परळी आणि वडवणी येथेही प्रत्येकी २५ लाभार्थ्यांची निवड केली. त्यासाठी चाचणी लाभार्थ्यांची
निवड करण्यासाठी कोविन ऍपमध्ये लसीकरण सत्र तयार करणे, त्याचे मॅपिंग करणे, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोविन पोर्टलवर अपलोह करणे, लाभार्थी व आरोग्य सेविकेचे सत्र निश्‍चित करणे, लस वाटप, शीतसाखळी केंद्राला कळवणे, आरोग्य सेविकाला सत्राचा वेळ व दिवस कळविणे, लसीकरण अधिकारी एक ते चार आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदार्‍या निश्‍चित करून त्यांना त्याची माहिती देणे आदी पुर्वतयारी याबाबत करण्यात आली. यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. या ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरिक्षण करून एका केंद्रावर २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल, कोविन ऍपवर नोंदणीनुसार कक्षात सोडले जाईल त्यानंतर माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाच्या माहितीची नोंद ऍपमध्ये करण्यात येईल. यासह अन्य बारीक-सारीक बाबींकडे लक्ष देण्यासाठी ड्राय रनचे प्रात्यक्षिक केले गेले आहे. बीडसह वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि परळी येथील ग्रामीण रुग्णालयात ड्राय रनचे प्रात्यक्षिक करण्यात आले. सदरचे प्रात्यक्षिक यशस्वी झाल्याचे सांगण्यात येते.

Most Popular

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...