Wednesday, January 27, 2021
No menu items!
Home क्राईम ‘भरोसा सेल’ पिडीतांचा आधार

‘भरोसा सेल’ पिडीतांचा आधार

गणेश जाधव | बीड

9922773117

पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी ’भरोसा’ अत्यंत उपयोगी आहे. पोलिस यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आलेल्या भरोसा सेलच्या माध्यमातून पीडित महिलांना विश्वास व मानसिक आधार देवून पुन्हा त्यांचे संसार सुरळीत झाले आहे. त्यामुळे बीडचे ‘भरोसा सेल’ पिडीतांचा आधार बनला आहे. येथे मोठ्या विश्‍वासाने पिडीता न्याय मागण्यासाठी येतात आणि त्यांना येथील कर्मचारी मोठा विश्‍वास देत आहेत.
एखादा गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याबरोबरच गुन्हा घडू नये, यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येतात. याच उद्देशाने बीड शहरात पोलिसांच्या संकल्पनेतून भरोसा सेलची स्थापना करण्यात आली आहे. या ‘सेल’च्या माध्यमातून महिलांना सुरक्षितता पुरवितांनाच गुन्ह्याच्या प्रतिबंधासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. हैद्राबादच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘भरोसा सेल’चा प्रयोग प्रथम नागपूर शहरात राबविण्यात आला. त्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. महिला अथवा मुलीला तिच्यावर झालेल्या अत्याचारां विरूद्ध लढण्यासाठी शारिरीक आणि मानसिक बळ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेला ‘भरोसा सेल’ महिलांसाठी विश्वासपात्र ठरला आहे. त्यामुळे महिला-मुलींचा ‘भरोसा’ येथील पथकाने जिंकला असून गत वर्षी १२६ तुटलेले संसार पुन्हा जुळविण्यात ’भरोसा सेल‘ला यश आले आहे. ‘भरोसा सेल’ हे पीडित महिलांच्या तक्रारी स्विकारण्यासाठी सुरु करण्यात आले आहे. पीडित महिलांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे वर्गीकरण करुन त्यांना त्यांच्या गरजेनुसार मार्गदर्शन करण्यात येते. संबंधीत तक्रारकर्त्यांचे समुपदेशनही करण्यात येते. भरोसा सेलमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींमधील पीडित व्यक्तीस न्याय मिळत नाही, तोपर्यंत तक्रार बंद करुन कुठलाही एकतर्फी निर्णय घेतला जात नाही. त्यांचा भरोसा जिंकुनच सर्व निर्णय घेतले जातात.

bharosa cel 2 1


महिलांप्रमाणेच पुरुषांसाठीही
‘भरोसा सेल’

‘भरोसा सेल’ पुर्वी महिला तक्रार निवार केंद्र नावाने ओळखला जात होता. मात्र सध्या त्याचे नामकरण केले असून ते ‘भरोसा सेल’ या नावाने ओळखले जाते. ज्या प्रमाणे पिडीत महिला येथे कौटुंबिक हिंसाचारांच्या तक्रारी घेवून येवू शकतात त्याच प्रमाणे पुरुष देखील येथे महिलांच्या विरुध्द तक्रार दाखल करु शकतात. त्यांना देखील न्याय मागण्याचा येथे अधिकार आहे. बीडच्या भरोसा सेलमध्ये ०५ टक्के पुरुषांनी महिलांविरुध्द तक्रारी दाखल केल्या आहे.

‘भरोसा सेल’ कुठे आहे व तक्रार कशी नोंदवावी?
बीड पोलिस अधिक्षक कार्यालय, आष्टी पोलिस ठाणे आणि गेवराई पोलिस ठाण्यात ‘भरोसा सेल’ स्थापन करण्यात आले आहेत. पिडीत महिलांना येथे तक्रार नोंदवितांना संपूर्ण माहिती असलेला अर्ज भरुन द्यावा लागतो. तक्रारीच्या स्वरुपावरुन महिलेला मोफत मार्गदर्शन करण्यात येते. व त्यांना येथे पून्हा संसार थाटण्यासाठी ‘भरोसा’ आणि आधार दिला जातो.

दोन्ही कुटुंबीयांचे ‘भरोसा सेल’मध्ये समुपदेशन
हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना कुठे व कसा न्याय मागावा हेच अनेकदा समजत नाही. त्याचप्रमाणे त्यांचे वेळीच समुपदेशन होणे गरजेचे असते. कुणाच्या सुखी संसाराला तडा जाऊ नये, यासाठी दोन्ही कुटुंबीयांचे ‘भरोसा सेल’मध्ये समुपदेशन करण्यात येते. समुपदेशन करुनही त्यांचे समाधान न झाल्यास शेवटी गुन्हा दाखल करण्यात येतो. यातून त्यांचा वेळ आणि पैशाची बचत होऊन महिलांना न्याय मिळण्यास निश्चित मदत होत आहे. त्यामुळे बीड पोलीसांच्या वतीने पिडितांचे संसार तुटु नयेत यासाठी भरोसा सेल स्थापन करण्यात आलेला आहे.

एकदा ‘भरोसा सेल’ची मदत घ्या
कौटुंबिक हिंसाचाराला मोठ्या प्रमाणात महिला बळी पडत आहे. नवविवाहितांसह दोन चार लेकरांच्या आईचा देखील हुंड्यासाठी छळ करणार्‍यांची संख्या समाजात मोठ्या प्रमाणात आहे. घर, कार किंवा दुकान टाकायची असेल तर तुझ्या माहेरकडून पैसे आन म्हणून विवाहितेचा छळ होतो. त्याच बरोबर चारित्र्यावर संशय घेवून देखील तिला मारहान केली जाते. या प्रमुख करणामुळे सुखी संसार मोडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा पिडीत महिला सासरच्यांविरुध्द ठाण्यात तक्रार दाखल करतात. मात्र त्यांनी एकदा ‘भरोसा सेल’ कडे तक्रार दाखल करावी त्यामध्ये दोन्ही कुटुंबीयांचे समुपदेशन केले जाते. त्यामध्ये जर तोडगा निघालाच नाही तर महिला पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल करु शकतात आणि कोर्टात देखील.

१२ महिन्या ४९१ तक्रारी; १२६ कुटुंबियांचे समुपदेशन
येथील भरोसा सेलमध्ये पीएसआय एस. जी. राठोड (प्रभारी), ए.एस.आय. एस.एम. मेहत्रे, एल.ए.एस.आय. एम. यू. केदार, मपोना. डि.डि. सावंत, मपोशि. आर.आर. गोरे, मपोशि ए.डी. खरमाटे आणि मपोशि के.व्ही. चव्हाण असे ७ कर्मचारी नियुक्त आहे. त्यांना गेल्या १२ महिन्यात वेगवेगळ्या प्रकारच्या ४९१ तक्रारी प्राप्त झाल्यात. त्यातील १२६ तक्रारकर्त्यांचे समुपदेशन करून वाद मिटत त्यांना पुन्हा सुखी संसार करण्याचा भरोसा येथील कर्मचार्‍यांनी दिला असून त्यांचे संसार सध्या सुखी आहेत. तर यातील ३४ प्रकरणे हे कोर्ट वर्ग करण्यात आले आहेत. ७२ अर्ज हे फाईल अर्ज आहेत. तर ९५ तक्रारी सध्या प्रलंबीत आहेत. या सेलमध्ये न्यायासाठी फिर्याद मागणार्‍या पिडीतांची संख्या दिवसेंदिवस वात आहे. २०२१ या वर्षात सात दिवसांमध्ये नवीन १० तक्रारी दाखल होतात. तर २०१९ मध्ये ५२६ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये २६१ तक्रारी निकाली काढत दोन्ही कुटुंबीयांचे ‘भरोसा सेल’मध्ये समुपदेशन करुन पुन्हा त्यांचा संसार थाटून दिला आहे. यातील ११५ तक्रारी ह्या पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आल्या आहेत. ८७ तक्रारी ह्या कोर्टात तर ६६ अर्ज फाईल अर्ज आहेत.

Most Popular

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक आर. राजा यांचा सन्मान

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी , पोलीस दलातील...