Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home बीड परळी धनंजय मुंडेंच्या जनता दरबारास वाढती गर्दी; अनेकांना वाटते काम मार्गी लागण्याची खात्री

धनंजय मुंडेंच्या जनता दरबारास वाढती गर्दी; अनेकांना वाटते काम मार्गी लागण्याची खात्री

!

परळी ऑनलाईन रिपोर्टर

—- : धनंजय मुंडे आणि भेटणाऱ्या लोकांची गर्दी हे समीकरण आता नित्याचे झाले आहे. याचाच प्रत्यय ना. मुंडेंच्या जनता दरबार उपक्रमात सातत्याने दिसून येत आहे. परळी येथील विश्रामगृहात आज आयोजित जनता दरबारात मागील वेळच्या दरबाराच्या तुलनेत गर्दी वाढलेली दिसून आली. शेवटच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून त्यावर आपली प्रतिक्रिया देईपर्यंत ना. धनंजय मुंडे यांचा जनता दरबार सुरूच राहतो, हे विशेष!

आजही जवळपास 4 ते 5 तास ना. मुंडेंनी भेटीला आलेल्या लोकांच्या / शिष्टमंडळाच्या समस्या ऐकून घेत त्यावर संबंधितांशी फोनवरून संवाद साधत, पत्र देऊन अशा विविध मार्गांनी जिथल्या तिथे अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले.

तसे तर धनंजय मुंडे जिथे लोकांना भेटतील तिथेच त्यांच्या कामांसबंधी उपाययोजना करण्यासाठी ते तातडीने सूत्रे हलवतात; मुंबई, बीड आणि परळी येथील त्यांच्या जनता दरबार उपक्रमांतर्गत विविध वैयक्तिक/सार्वजनिक कामे, अडचणी, समस्या घेऊन भेटायला येणाऱ्यांची वाढती संख्या ही ‘येथे आपले म्हणणे ऐकून घेतले जाईल व त्यावर नक्कीच मार्ग काढला जाईल!’ ही खात्री सामान्य माणसाच्या मनात रुजत असल्याचे स्पष्ट करणारी ठरत आहे!

वैजवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांचा ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

परळी तालुक्यातील वैजवाडी येथील अनेक वर्ष भाजपचे काम करणाऱ्या ज्येष्ठ व तरुण कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. १०) ना. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला. यात प्रामुख्याने नारायण भांगे, लिंबाजी भांगे, अशोक मोगले, बिभीषण मोगले, नितीन विठ्ठल सानप, बाळू ढाकणे, शत्रुघ्न भांगे, गणेश गडदे, आकाश मोगले, अनिल मोगले, ज्ञानदेव मुंडे, केदार सानप, सोमनाथ लक्ष्मण बडे, प्रकाश सानप, गिरीराज सानप यांसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला; यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या पौळ, परळी न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड, युवा नेते रामेश्वर मुंडे यांसह आदी उपस्थित होते.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....