Friday, January 22, 2021
No menu items!
Home बीड 'मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा रिलेशनशिपसाठी दबाव!', भाजप नेते कृष्णा हेगडे पोलिसात

‘मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा रिलेशनशिपसाठी दबाव!’, भाजप नेते कृष्णा हेगडे पोलिसात

 मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने कथित आरोप केला आहे. याबाबत मुंडे यांनी आपली बाजू स्पष्ट केली असून ब्लॅकमेलिंगच्या उद्देशाने आरोप होत असल्याचं म्हटलं. परंतु विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यातच आता एक नवा ट्विस्ट आला आहे. कारण भाजप नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. एवढंच नाही तर हेगडे हे धनंजय मुंडेंच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात तक्रार करण्यासाठी अंबोली पोलिस ठाण्याकडं निघाले असल्याची माहिती त्यांनी दिलीय.

कृष्णा हेगडे बोलताना म्हणाले की, 2010 पासून रेणू शर्मा ही महिला मला त्रास देत होती. ती मला फोर्स करत होती की मी तिच्याबरोबर संबंध ठेवावे. मी तिला दुर्लक्षित करत होतो. तरीही ती वेगवेगळ्या नंबरवरुन मला फोन करायची मेसेज करत होती. मी तिच्याबद्दल माहिती काढल्यानंतर हा हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचे समजले. आता 6 जानेवारीला मला तिनं पुन्हा मेसेज केले. त्यानंतर मला धनंजय मुंडेचं प्रकरण समजलं. इतक्या वर्षानंतर हे प्रकरण बाहेर आणलं. आज मुंडेंचं प्रकरण बाहेर आलं. उद्या मला फसवलं असतं परवा अजून कुणाला फसवलं असतं. म्हणून मी तक्रार द्यायला पोलिसात जात आहे. मी पोलिसांना माहिती दिली आहे. धनंजय मुंडे माझे मित्र नाहीत पण ही महिला कुणालाही टार्गेट करु शकते, असं हेगडे म्हणाले.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

बीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव

बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आज दुपारी जाहीर करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक यांची तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव यांची...