Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनागेवराई उपजिल्हा रुग्णालयात कोविड लसीकरण मोहिमेचा आ.लक्ष्मण पवारांच्या हस्ते शुभारंभ

गेवराई उपजिल्हा रुग्णालयात कोविड लसीकरण मोहिमेचा आ.लक्ष्मण पवारांच्या हस्ते शुभारंभ

दुपारपर्यंत आरोग्य विभागातील 55 जणांना देण्यात आली लस

गेवराई (भागवत जाधव) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघा देश ज्याची वाट पाहत होता. त्या महामारीवरील देशव्यापी लसीकरनाला आज देशभरात सुरुवात करण्यात आली असून गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालय येथे ही या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून दुपार पर्यंत एकूण 55 जणांना ही लस देण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एच.व्ही.चिंचोळे यांनी दिली.
आज देशभरात सुरू करण्यात आलेल्या या लसीकरण मोहिमेत बीड जिल्ह्यात 17 हजार लसीचे डोस उपलब्ध झाले असून जिल्ह्यात पाच केंद्रावर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात पहिल्या टप्प्यात एकूण 1800 लसीचे डोस उपलब्ध करण्यात आली असून या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ.लक्ष्मण पवार, तहसीलदार सचिन खाडे, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.एच.व्ही.चिंचोळे, भुलतज्ञ डॉ.राजेश शिंदे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, राजेंद्र राक्षसभुवनकर, डॉ.सराफ, डॉ.रांदड, डॉ.राजेंद्र आंधळे, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सर्वोत्तम शिंदे, डॉ.मंत्री, डॉ.आबेद जमादार यांच्यासह पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.
यावेळी धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलन करून सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ मंगेश खरात यांना पहिली लस टोचून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यानंतर दुपारपर्यंत जवळपास 55 जणांना ही लस देण्यात आली होती. गेवराई येथील रुग्णालयात नोंदणीनुसार रोज 100 जणांना ही लस टोचणार असून पहिल्या टप्प्यात शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असल्याचे भुलतज्ञ डॉ.राजेश शिंदे यांनी सांगितले. तर
आजपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने पाच ते सहा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह मदतगार स्टाफ व व्हेंटिलेटर सारख्या सुविधा सज्ज करून ठेवल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.एच.व्ही.चिंचोळे यांनी दिली.

चौकट

मनात कुठलीही भीती न बाळगता ही लस टोचून घ्या – आ.लक्ष्मण पवार

कोरोना महामारीवर लस उपलब्ध झाल्याने संपूर्ण देशभरात आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते आज या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून देशभरात सर्वत्र ही लस उपलब्ध करण्यात आली असून प्रत्येकाने मनात कुठलीही भीती न बाळगता हे लस टोचुन घ्यावी असे आवाहन आ.पवार यांनी यावेळी बोलताना केले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!