Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeराजकारणमाजलगावमध्ये भाजपाचे वर्चस्व नित्रूड ग्रा.पं. कम्युनिस्टांच्या ताब्यात

माजलगावमध्ये भाजपाचे वर्चस्व नित्रूड ग्रा.पं. कम्युनिस्टांच्या ताब्यात


माजलगाव (रिपोर्टर)- तालुक्यामध्ये चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषीत झाल्या होत्या. या चारही ग्रा.पं.मध्ये अटीतटीच्या लढती झाल्या. चारपैकी दोन ग्रा.पं.वर भाजपाचा झेंडा फडकला तर सर्वात मोठी नित्रुड ग्रामपंचायत कम्युनिस्ट पक्षाने ताब्यात घेतली. फक्त एक ग्रामपंचायत राष्ट्रवादीला राखता आली.


नित्रुड ग्रामपंचायत १७ सदस्यांची आहे. या ग्रामपंचायतमध्ये कॉ. दत्ता डाके यांनी आपले पॅनल उभा केले होते. या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध कम्युनिस्ट अशी लढत झाली. राष्ट्रवादीला मतदारांनी धूळ चारत दत्ता डाके यांच्या पॅनलला भरभरून साथ दिली. त्यांच्या १२ जागा निवडून आल्या तर राष्ट्रवादीला फक्त पाच जागा मिळाल्या. गंगामसला येथे भाजपाच्या सहा जागा , राष्ट्रवादी चार त र एक अपक्ष उमेदवार विजयी झाला. दिंद्रुडमध्ये भाजपाने अकरा जागा मिळवल्या तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या. फक्त मोगरा ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आली. या ठिकाण रा.कॉं.ला सहा जागा मिळाल्या.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!