दिंद्रुड (रिपोर्टर) घराबाहेर खेळत असलेल्या एका दहा वर्षीय मुलीवर विनयभंग करत अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीवर दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बाल लैंगिक अत्याचार कायदा सह ट्रॉसिटी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दिंद्रुड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावातील दहा वर्षीय दलित अल्पवयीन मुलगी घराबाहेर खेळत असताना तुला दहा रुपये देतो म्हणत आरोपीने तिला घरात नेले. पलंगावर झोप म्हणत तिच्याशी अश्लील चाळे तो करू लागला. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात येता मुलीने रडत रडत आपले घर गाठले. घडला सर्व प्रकार तिने आपल्या आई-वडिलांना सांगितला. तात्काळ दिंद्रुड पोलीस स्टेशन गाठत आईच्या फिर्यादीवरून भगवान नरवडे या आरोपी विरोधात दिंद्रुड पोलिसात विनयभंग, ट्रॉसिटी,बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी दिंद्रुड पोलिसांनी अटक केला. दिंद्रुड पोलिसात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली असून बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात कर्तव्य तत्पर अधिकारी नेमण्याची गरज असल्याचे आता चर्चिले जात आहे. दिंद्रुड पोलिसांची निष्ठुरता सदरील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फिर्यादी सोबत आलेल्या लोकांना भर पावसामध्ये पोलीस स्टेशनमधून बाहेर काढण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी
सदरील घडलेला प्रकार समजताच भीम आर्मी एकता मिशनचे बीड जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मांयदळे व डीपीआय चे माजलगाव तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे हे पीडीतेच्या बाजूने दिंद्रुड पोलीस स्टेशन मध्ये आले असता तुम्ही कशाला आला आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू अशी धमकी दिंद्रुड पोलिसांनी दिली.