गेवराई (रिपोर्टर) औरंगाबादहुन गेवराईकडे भरधाव वेगात येणार्या एका चारचाकी कार ने दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघात दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी उमापूर फाट्यावर घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की, मालेगाव येथील आबासाहेब गंगाधर व बाळासाहेब जराड हे दोघे दुचाकी क्रमांक एम. एच 20 ए.ई 9713 यावरून आपल्या गावाकडे जात असताना रोड ओलांडून जात असताना त्याच दरम्यान औरंगाबाद हून गेवराई कडे भरधाव वेगाने येणार्या एका कारने दुचाकी त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने हे दोघेही लांब फेकले गेल्याने त्यांना मोठी दुखापत झाली असून त्यांना तात्काळ गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.