Monday, March 8, 2021
No menu items!
Home बीड शिवजयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी -जिल्हाधिकारी

शिवजयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी -जिल्हाधिकारी

बीड (रिपोर्टर)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित छत्रपती शिवाजी महाराज जयंती ( शिवजयंती ) हा सण-उत्सव महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार १९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरी केला जातो.
कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी आर. एस. जगताप यांनी जारी केल्या आहेत. जिल्ह्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे, दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतू यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक, इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्राचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे, शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबीरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी, आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे., कोविड-१९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकिय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका/नगरपंचायत, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच शासनाने किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाने या नंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे जिल्हाधिकारी आर. एस. जगताप यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

Most Popular

पांगरबावडी जवळ भिषण अपघात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

पांगरबावडी जवळ भिषण अपघातएकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यूपाच गंभीर, मृतामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेशबीड । रिपोर्टरवडवणी कडून बीडकडे येणार्‍या रिक्षाला ट्रकणे जोराची धडक...

पुजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाइल पळविला परळी शहरात घडली घटना

परळी (रिपोर्टर)- तुझ्या बहिणीबद्दल बोलायचे आहे, असे सांगून पुजा चव्हाणच्या बहिणला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका तरुणीने मोबाईल हिसकावून घेत पळ...

सराफाला लुटणारी टोळी गजाआड

चोरीचे सोने घेणार्‍या सराफाच्याही आवळल्या मुसक्यादैठण फाट्यावर भरदिवसा घडली होती घटनाबीड (रिपोर्टर)- मिरगावचा बाजार करून गेवराईकडे परतणार्‍या एका सराफाला दैठण फाट्याजवळ अडवून...

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...