Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनामुलींच्या वसतिगृहातील कोरोना वॉर्डाला स्टाफ द्या नसता उपोषण करावे लागेल

मुलींच्या वसतिगृहातील कोरोना वॉर्डाला स्टाफ द्या नसता उपोषण करावे लागेल

इन्चार्ज बेदरे यांचा सीएसला इशारा
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्हा रुग्णालयात मुलींच्या वसतिगृहातील कोरोना वॉर्डात स्टाफ नाही, नर्स नाहीत, वॉर्ड बॉय नाहीत, या कोरोना वॉर्डाला तात्काळ स्टाफ द्या नाही तर मी तुमच्या कॅबिनसमोर उपोषण करील, असा इशारा हा वॉर्ड सांभाळणारे बेदरे यांनी सिव्हील सर्जन यांना दिला.
   जिल्हा रुग्णालय कोविडच्या रुग्णांमुळे हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे नर्सिंग कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात कोरोना रुग्णांचा वॉर्ड तयार करण्यात आला. या वॉर्डामध्ये सध्या 167 रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयाला 20 नर्स, 14 वॉर्ड बॉय आणि फिजिशीयन डॉक्टरांची नियुक्ती केली आहे मात्र या वॉर्डात रुग्ण दाखल केल्यापासून दोन किंवा तीनच कर्मचार्‍यांचा स्टाफ दिला जातो. यात दोन-तीन कर्मचार्‍यांना अख्खा वॉर्ड सांभाळता येत नही. अनेक वेळा हा वॉर्ड सांभाळणार्‍या मेटरन तथा हॉस्टेलच्या प्राचार्या बेदरे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. अनेक वेळा सिव्हील सर्जनकडे कर्मचार्‍यांची मागणी करूनही कर्मचारी मिळत नसल्याने आज सकाळी बेदरे यांनी मला दहा मिनिटात हा वॉर्ड सांभाळण्यासाठी कर्मचारी द्या, नसता मला तुमच्या कॅबिनसमोर उपोषण करावे लागेल, असा इशाराच बेदरे यांनी सिव्हील सर्जन यांना दिला. त्यामुळे परत एकदा जिल्हा रुग्णालयातील नियोजनाचा ढिसाळपणा दिसून आला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!