Saturday, June 19, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोना रोखण्यासाठी बीडचे अख्खे प्रशासन रस्त्यावर जिल्हाधिकारी, एसपी, सीईओ, तहसिलदारांनी केल्या कारवाया

कोरोना रोखण्यासाठी बीडचे अख्खे प्रशासन रस्त्यावर जिल्हाधिकारी, एसपी, सीईओ, तहसिलदारांनी केल्या कारवाया


बीड (रिपोर्टर) बीड शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता समुह संसर्ग पाहता आज दुपारी अख्ख जिल्हा प्रशासन रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, जि.प.चे मुख्याधिकारी, एस.डी.एम., तहसिलदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तळ ठोकून येणार्‍या जाणार्‍या वाहन चालकांची चौकशी करत विनाकारण फिरणार्‍यांना तात्काळ दंड ठोठावला. दुपारी 4.30 वाजल्यापासून हे सर्व अधिकारी रस्त्यावर होते.

l2


बीड शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचा समुह संसर्ग झपाट्याने वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नांची परिकाष्टा करत आहे. मात्र या स्थितीतही लोक रस्त्यावर दिसून येत आहेत. आज मात्र जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा पोलिस अधिक्षक राजा रामास्वामी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, तहसिलदार वमने, एसडीएम यांनी शिवाजी चौकात तळ ठोकला. येणार्‍या जाणार्‍या वाहन चालकांची कसून चौकशी केली. जे विनाकारण फिरताना आढळून आले त्यांना तात्काळ दंड ठोठावला.

l3

Most Popular

error: Content is protected !!