परळी, (रिपोर्टर):- कॅनॉलमध्ये पोहण्यास गेलेल्या 16 वर्षीय मुलगा पाण्यात बुडाला असून त्याचा शोध अग्नीशामक दल घेत आहे.
गणेश शिवाजी करवर हा 16 वर्षीय मुलगा परळी तालुक्यातील दगडवाडी शिवारातील कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. तो बुडाला असून त्याचा शोध परळीचे अग्निशामक दल घेत आहे. दुपारपर्यंत तो सापडला नव्हता. सध्या माजलगाव येथील उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे कालव्यातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने गणेश बुडाल्याची प्राथमिक माहिती हाती आली. सदरील हा मुलगा मुळचा परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील हाटकरवाडी येथील आहे. दगडवाडी येथे वडीलाला भेटायला तो आला होता.