बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील दोन उपजिल्हाधिकार्यांच्या बदल्या झाल्या असून ते आपल्या पदावरून लागलीच कार्यमुक्त झाले आहेत. गेल्या चार वर्षापासून बीड येथे भूसंपादन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मच्छिंद्र सकटे यांची बदली सिंधुदुर्ग येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून झाली आहे तर साडेतीन वर्षापासून कार्यरत असलेले नामदेव टिळेकर यांची बदली बीड येथून माळशिरस या ठिकाणी याच समकक्ष उपविभागीय अधिकारी पदावर झालेली आहे.
मच्छिंद्र सकटे हे शांत व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांनी बीड येथे आपली ओळख निर्माण केली. काही दिवस त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी पदाचाही पदभार सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात जायकवाडी प्रकल्पांतर्गत भूसंपादन झालेल्या शेतकर्यांची लवादाची प्रकरणे त्यांनी तातडीने हाताळली आणि बाजार भावाप्रमाणे त्यांना मोबदला मिळवून दिला. बीड येथे मधल्या काळात अधिकार्यांचा तुटवडा असताना त्यांनी चार-चार पदांचा अतिरिक्त पदभार सांभाळलेला आहे. ते बीड येथे कोकण महसूल विभागातून बदलून आले होते. त्यामुळे कोकण महसूल विभागाकडेच त्यांचा जाण्याचा कल असल्याने त्यांना सिंधुदुर्ग या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे तर नामदेव टिळेकर यांची बदली बीड येथे उपविभागीय अधिकारी म्हणून झाली होती. आपल्या कार्यकाळात उपविभागामध्ये शांतता राखण्याचेही काम उपविभागीय अधिकारी म्हणून केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस जिल्ह्यात माळशिरसचे उपविभागीय अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. बीड जिल्ह्यात त्यांच्या जागी अद्याप सरकार अद्याप कोणाची नियुक्ती केलेली नाही.