Thursday, December 3, 2020
No menu items!
Home बीड तलाठी मंडळाधिकार्‍यांनी सतर्क आणि प्रामाणिक रहावे वाळू माफियांचे कंबरडे मोडायला मी खंबीर...

तलाठी मंडळाधिकार्‍यांनी सतर्क आणि प्रामाणिक रहावे वाळू माफियांचे कंबरडे मोडायला मी खंबीर आहे-जिल्हाधिकारी


वाळू माफियांकडून झालेल्या हल्ल्या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांची गेवराई तहसील कार्यालयात बैठक
भागवत जाधव | गेवराई
गेवराई-वाळू चोरी कोण करतय, त्यासाठी आजूबाजूलाच उभी असलेली वाहने कशासाठी उभी राहतात, या सगळ्या प्रकरणाची माहीती तलाठी-मंडळ अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांना आहे का नाही. नसेल तर मग , तुम्हाला नेमक काय माहीत आहे. असा सवाल उपस्थित करून, अरे, वाळू तस्करी करणारे गुंड हिमंत कशी करतात, तुम्हाला मारले म्हणजे मला मारल्या सारखे आहे. तुम्ही सतर्क आणि प्रामाणिक रहा, यांचे कंबरडे मोडायला मी खंबीर असल्याचा इशारा जिल्हाधिकारी रेखावार यांनी येथे आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना असून, यापुढे, गोदाकाठी वाळू साठा आढळून आल्यास तलाठी आणि मंडळ अधिकार्‍यांना जबाबदार धरून, आधी तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम ही त्यांनी यावेळी बैठकीत बोलताना दिल्याची माहीती आहे.
आज शुक्रवार दि. २० रोजी जिल्हाधिकार्‍यांनी तहसील कार्यालयात दुपारी ३:०० वा. तहसीलदार, ना.तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, यांच्याशी तहसील पथकावर वाळू तस्कारांनी केलेल्या मारहाण प्रकरणावर बंद दाराआड चर्चा केली. दरम्यान अधिकारी कर्मचारी यांच्यावर हात उचलण्याची हिंमत वाळू माफिया करतातच कशी, यापूर्वीही अनेकवेळा आशा घटना घडल्या असून याबाबत आता तुम्ही प्रामाणिक रहा मग कोण तुमच्यावर हात उगारतो ते मी बघतो, आपल्यातीलच काही लोक वाळू माफियांना सोबत घेऊन फिरत आहेत, त्यामुळे ही वेळ येत आसल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान यापूर्वी प्रभारी तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या गाडीला वाळूच्या हायवाने धडक दिलेल्या प्रकरणात जिल्हाधिकारी रेखावार यांनी तातडीने येऊन, तस्कारांचा माज जिरवण्याची भाषा केली होती. मात्र, काही महिने उलटूनही वाळू चोरी करणार्‌या तस्कर गुंडाची दहशत कायम असल्याचे दिसून येत असून रात्री झालेल्या या मारहाण प्रकरणाची त्यांनी गंभीर दखल घेतली असून, गेवराई तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत कर्मचारी-अधिकार्‍यांना चांगलेच झाप-झाप झापले असल्याची माहीती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

Most Popular

बिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला

बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आले नसतानाच बीडच्या सीमेलगत चर्‍हाट्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची...

माजी मंत्री पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

बीड (रिपोर्टर)- मला सर्दी खोकला आणि ताप असल्याने मी जबाबदारी स्वीकारून स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे, अशी माहिती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी...

गावागावात नरभक्षी सन्नाटा अफवामुळे संभ्रम

किन्ही गावातील काही रहिवाशांचे पलायन, लहान मुलांनी स्वत:ला कोंडून घेतले; सायंकाळी पाच नंतर घराची दारे बंद करून घेतात ग्रामस्थसंपुर्ण रात्र जीव मुठीत...

पिंपळनेर येथील जेष्ठ स्वतंत्र सैनिक किसनराव नरवडे पाटील यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार

  पिंपळनेर - रिपोर्टर . बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील जेष्ठ स्वतंत्र सैनिक किसनराव नरवाडे पाटील यांचे...