Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडआरोग्य कर्मचार्‍यांच्या भरतीत कंत्राटी कर्मचार्‍यांना प्राधान्य द्या महसूल कर्मचार्‍यात बदल्यावरून तीव्र असंतोष

आरोग्य कर्मचार्‍यांच्या भरतीत कंत्राटी कर्मचार्‍यांना प्राधान्य द्या महसूल कर्मचार्‍यात बदल्यावरून तीव्र असंतोष


जिल्हाधिकार्‍यांना देणार निवेदन
बीड (रिपोर्टर):- काल जिल्हाधिकारी कार्यालयाने आस्थापनेवरील ८५ कर्मचार्‍यांच्या बदल्या केलेल्या आहेत. या बदल्या शसानाच्या बदली धोरणाला बगल देत निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आणि जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केल्यामुळे महसूल कर्मचार्‍यात तीव्र असंतोष पसरला आहे. याबाबत महसूल कर्मचारी संघटना जिल्हाधिकार्‍यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देत आहे.


राज्य शासनाने महसूल कर्मचार्‍यांच्या बदल्या करताना केवळ प्रशासकीय कारणास्तवच बदल्या कराव्यात, या बदल्या करताना समुपदेशनाने रिक्त पदांची माहिती अगोदर सर्वांना द्यावी किंवा ही यादी प्रसिद्द करावी, सेवानिवृत्तीला केवळ वर्ष ते सहा महिने कालावधी राहिलेला असताना अशा कर्मचार्‍यांची बदली करण्यात येऊ नये, अपंग कर्मचारी, ज्या कर्मचार्‍यांचे आई-वडिलांना दिर्घ आजार आहे अशा कर्मचार्‍यांना या बदली प्रक्रियेतून सुट देण्यात यावी, बदली करताना पती-पत्नी एकत्रीकरण या शासन नियमाचाही विचार करावा, असे आदेश शासनाचे असताना कालच्या बदली प्रक्रियेमध्ये शासनाच्या या एकाही नियमाचे पालन निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केलेले नाही. त्यामुळे या बदली प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि गैरसोय झालेली आहे. ही अनियमितता दूर करावी आणि शासनाच्या बदलीच्या मार्गदर्शक तत्वानुसारच बदल्या करण्यात याव्यात या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांना आज निवेदन देण्यात आले. निवेदनावर महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय हंगे, चंद्रकांत जोगदंड, राख तात्या, नायब तहसीलदार सुहास हजारे, मंडळ अधिकारी नितीन जाधव, मोहन चौरे, बालाजी कचरे, सुनिल आईटवाडे, श्रीमती नागरगोजे, हर्षद कांबळे, राहुल शेटे, जयंत तईखेडकर, इंद्रजीत शेळके या महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा सह्या आहेत.

Most Popular

error: Content is protected !!