Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडजिल्ह्यातील महिला असुरक्षित, ७ महिन्यात ८५ बलात्कार महिला अत्याचाराच्या ६३८ गंभीर घटना

जिल्ह्यातील महिला असुरक्षित, ७ महिन्यात ८५ बलात्कार महिला अत्याचाराच्या ६३८ गंभीर घटना


बीड (रिपोर्टर):- मुलगा होत नाही म्हणून बळजबरीने गर्भपात, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, विनयभंग, छेडछाड यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण बीड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कार्यकाळात प्रचंड प्रमाणात वाढल्याचे समोर येत असून गेल्या सात महिन्याच्या कालखंडात महिला अत्याचाराचे तब्बल ६३८ गुन्हे नोंद झाले असून ८५ महिला-मुलींवर बलात्कार झाल्याचे यातून समोर येत असल्याने बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पुर्णत: ढासळल्याचे समोर येत आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून पोलिसांच्या हप्तेखोर भूमिकेमुळे गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी गुन्ह्यांचा आलेख वाढला असून मागच्या वर्षीच्या तुलनेत २४८ गुन्हे वाढल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.


सामाजिक, राजकीय विषयात संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक राहिला नसल्याचे गेल्या सात महिन्यांच्या कालखंडात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांवरून दिसून येत आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक राजारामा स्वामी यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांनी तोंड वर काढले असून गेल्या सात महिन्यांच्या कालखंडामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तब्बल ६३८ स्त्री अत्याचाराचे गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये तब्बल ८५ महिला-मुलींवर बलात्कार झाल्याचे नोंदवण्यात आले असून बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जिल्ह्यातील महिला असुरक्षित असल्याचे समोर येत आहे. कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले असून मुलगा होत नाही म्हणून गर्भपात करण्यापर्यंत गुन्हेगारी मानसिकता समोर येत आहे. कौटुंबिक हिंसाचारात २४४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुलींना पळवून नेणे हे ५९ गुन्हे दाखल असून छेडछाडीचे आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार ३ गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२१ च्या आठव्या महिन्यातच २४८ गुन्हे वाढले असल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!