Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडन.प., नगर पंचायतींच्या विकास कामांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू -आ.धस

न.प., नगर पंचायतींच्या विकास कामांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू -आ.धस


बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायत अंतर्गत येणार्‍या विविध विकास कामांसाठी राज्य सरकारकडे आपण प्रयत्न करू, असे सांगत विकास कामे लवकरात लवकर पुर्ण करायला हवेत. घरकुल योजनेची अमलबजावणी करून सर्वसामान्यांना तात्काळ घरकुल उपलब्ध करून द्यावेत, असे भाजपा आमदार सुरेश धस यांनी सांगितले. त्यांनी आज बीड नगरपालिकेत आढावा बैठक घेतली.


बीड, उस्मानाबाद, लातूर मतदारसंघाचे प्राधिकारी आमदार सुरेश धस हे कालपासून उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्याचा दौरा करत आहेत. आज सकाळी त्यांनी बीड नगरपालिकेत भेट दिली. या वेळी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, न.प.चे मुख्याधिकारी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. या वेळी बोलताना आ. सुरेश धस यांनी घरकुल योजनांची तात्काळ अमलबजावणी होत लोकांना घरे मिळायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त करत विकास कामे जलदगतीने व्हावेत, जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपंचायतींच्या विकास कामांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगत रमाई आवास योजनेला गती येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी नगरसेवक फारुक पटेल, विनोद मुळुक, गणेश वाघमारे, नरसिंग नाईकवाडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!