बीड (रिपोर्टर): पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन झालेल्या वादानंतर एकाला कुर्हाडीच्या तुंब्याने मारहाण करत गंभीर जखमी केले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंडू बाबुराव लकडे (वय 50 वर्षे, रा. धनगरवाडी ता. जि. बीड) यांनी बीड ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जुन्या पैशाच्या कारणावरुन बाजीराव सिताराम भावले, बापुराव सिताराम भावले, रावसाहेब सिताराम भावले (सर्व रा. धनगरवाडी ता. जि. बीड), बाबासाहेब आश्रुबा चोरमले (रा. पोहीचा देवी माजंरसुंबा) यांनी संगणमत करुन दि. 21 जुलै रोजी सायंकाळी कोळवाडी तलावाजवळील रोडवर शिविगाळ करुन मारहाण केली. कुर्हाडीचा तुंबा डोक्यात घालून जमखी केले. लाथाबुक्यांनी मारहाण केली. असे फिर्यादी लकडे यांनी म्हटले आहे. त्यावरुन बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत. जखमीवर जिल्हारुग्णालयात उपचार सुरु आहेत.












