Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडकिसान सभेचा चुंबळी फाट्यावर रास्ता रोको, महावितरणाचा निषेध करत शेतकरी रस्त्यावर उतरले

किसान सभेचा चुंबळी फाट्यावर रास्ता रोको, महावितरणाचा निषेध करत शेतकरी रस्त्यावर उतरले


बीड/पाटोदा (रिपोर्टर) वीज वितरण कंपनीकडून सक्तीने बिलाची वसुली केली जात असून यामुळे सर्वसामान्य शेतकर्‍यांना जाणीवपुर्वक वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. वीज वितरण कंपनीने ही सक्तीची वसुली थांबवून ज्या शेतकर्‍यांचे कनेक्शन तोडले आहे त्यांचे कनेक्शन जोडून देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने चुंबळी फाट्यावर आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको अंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीने मनमानी सुरू केली. हजारो शेतकर्‍यांचे विजेचे कनेक्शन तोडले. ऐन रब्बीच्या हंगामात वीज कनेक्शन तोडल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. वीज वितरण कंपनीने सक्तीची वीज बील वसुली थांबवावी. ज्या शेतकर्‍यांचे विजेचे कनेक्शन तोडलेले आहे त्या शेतकर्‍यांचे कनेक्शन जोडून देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आज महाराष्ट्र किसान सभा रस्त्यावर उतरली. पाटोदा तालुक्यातील चुंबळी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. हे आंदोलन कॉ. महादेव नागरगोजे, विष्णूपंत घोलप, गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील शतेकरी सहभागी झाले होते. या वेळी पाटोदा ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळेकर, मंडल अधिकारी सानप, बीट अमलदार सोनवणे यांना शेतकर्‍यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

भूसंपादनाच्या मावेज्यासाठी

शेकापचा कार्यकर्ता बसला रोहयो मंत्र्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला
बीड जिल्ह्यातील शेकडो शेतकर्‍यांची जमीन तलावासाठी संपादीत केलेली आहे. मात्र या शेतकर्‍यांना अद्यापही मावेजा मिळालेला नाही. मावेजासाठी अनेक वेळा रोहयो मंत्रालयाकडे निवेदन देण्यात आले मात्र याची दखल रोहयो मंत्री संदीपान भुंबरे यांनी घेतली नसल्याने बीड येथील शेकापचे कार्यकर्ते भाई राजेंद्र नवले हे आजपासून भुंबरे यांच्या औरंगाबाद येथील कार्यालयासमोर उपोषणाला बसले.

Most Popular

error: Content is protected !!