Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमकेजमध्ये गुटखा पुरवणार्‍या डिलरच्या गोडाऊनवर धाड दीड लाखाचा गुटखा जप्त

केजमध्ये गुटखा पुरवणार्‍या डिलरच्या गोडाऊनवर धाड दीड लाखाचा गुटखा जप्त


बीड (रिपोर्टर)- महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सर्रासपणे गुटखा विक्री होत आहे. केजचे सहायक पोलीस अधिक्षक कुमावत यांनी केज शहरातील टपर्‍यांवर धाडी टाकून त्यांना पुरवणार्‍या गुटखा डिलरचा शोध घेत त्यांच्या गोडाऊनवर छापा टाकून दीड लाखाचा गुटखा जप्त करून चौघा जणांवर गुन्हा दाखल केला.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत आहे. बाहेरून येणारा लाखोंचा गुटखा बीडमध्ये हातोहात पार्सल केला जातो. छोट्या-मोठ्या टपर्‍यांना डिलर गुटखा पुरवतात. या डिलरवर कारवाई करण्यासाठी काल कुमावत यांच्या पथकाने केज शहरातील विविध टपर्‍यांवर धाडी टाकल्या. मात्र त्यांच्याकडे गुटखा मिळून आला नाही. मात्र यापुर्वी त्यांना अनेक डिलरने गुटखा पुरवला होता. त्या डिलरची माहिती घेऊन काल पोलिसांनी बोबडेवाडी रोडवरील अजिजपुरा येथील सय्यद आरेफ यांचे भाड्याने केलेल्या रुममध्ये छापा टाकला (पान 7 वर)
असता तेथे 1 लाख 46 हजार 30 रुपयांचा गुटखा मिळून आला. पोलिसांना पाहताच गुटखा माफिया फरार झाले. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात तौफिक ऊर्फ बब्या जाकेर शेख, अमजद जाकेर शेख (दोन्ही रा. अजिजपुरा केज), शेख इसाक शेख खाजामियॉ कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला केज) व अकबर पठाण (रा. अजिजपुरा केज) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी दराडे यांच्यासह पोलिसांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!