Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमविहिरीत पडून अडीच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, गोलंग्री येथील दुर्दैवी घटना

विहिरीत पडून अडीच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, गोलंग्री येथील दुर्दैवी घटना

नेकनूर(रिपोर्टर) आईसोबत शेतात गेलेल्या एका अडीच वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रात्री बीड तालुक्यातील गोलंग्री येथे उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पिल्या बापुराव मोरे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तो काल दुपारी आईसोत शेतात गेला होता. दुपारी त्याची आई विहिरीवरील विद्युत मोटर चालू करण्यासाठी विहिरीकडे गेली होती. त्याच वेळेस तिचा मुलगाही तिच्या मागे गेला. मात्र तिच्या लक्षात आले नाही. ती विद्युत मोटर सुरू करून आली असता तिला मुलगा दिसला नाही. तिने इतरत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. त्यानंतर तो मुलगा विहिरीत पडला असावा, असा अंदाज बांधून दुपारी वाजल्यापासून विहिरीतील पाणी उपसण्यास सुरुवात केली असता रात्री अकरा वाजता सदरील चिमुकल्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाण्याचे पीएसआय विलास जाधव, गायकवाड, डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!