वडवणी (रिपोर्टर):- एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या सोन्यावर आणि मोल्यवान वस्तुवर अज्ञात चोरट्यांचा सध्या सुळसुळीत पाहवयास मिळत असून वडवणी शहरातील रहिवाशी असणाऱ्या 31 वर्षीय युवकाच्या गळ्यातील एक तोळा सोन्याचे लाँकेट परळी येथील बसस्थानकात अज्ञात चोरट्यांने चोरले असल्याची घटना दि.8 एप्रिल 2024 रोजी रोजी घडली आहे. याबाबत परळी पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत आधिक माहिती अशी कि, वडवणी शहरातील भीमनगर येथील रहिवाशी असणारे पवन महादेव उजगरे (वय-31 वर्ष) हे फायनान्सचे काम करत असल्याने परळी येथील शिवाजी नगर व दाऊतपुर येथील ग्राहकांना भेटून सायं 5 वाजण्याच्या सुमारास परळी बसस्थानकात वडवणीकडे येण्यासाठी थांबले होते. लग्नसराई असल्याने गर्दी प्रंचड प्रमाणात होती. यात मानवत बस तेलगांव मार्गे माजलगांवकडे जाणारी लागली याच एसटी बसमध्ये थांबलो तर बस न हालताच अवघ्या 10 मि. समजले कि, गळ्यातील एक तोळा वजनाची रस्सी (लाँकेट) अंदाज किं. 45 हजार रु.ची चैन नाही तेव्हा पवन उजगरे यांनी आजूबाजूला पडलेली आहे का ते पाहिले परंतु ती मिळून आली नसून बसमध्ये चढत आसतानाच कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरली असल्याची खात्री झाली आहे असे समजण्यात आल्या नंतर पवन महादेव उजगरे यांच्या फिर्यादीवरुन परळी पोलीसात अज्ञात चोरट्या विरोधात कलम 379 भांदवीनुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत. तर सध्या लग्नसराई आणि सुट्टीचे दिवस असल्या कारणाने प्रवाशांची बसस्थानक आणि बस प्रवाशात प्रंचड गर्दी होत आहे. याचाच फायदा घेत चोरटे प्रवाशांच्या मोल्यवान वस्तुवर नजर ठेवून चोरी करत असल्याच्या घटना घडत असून आता प्रवाशांनीच दक्ष राहण्याची गरज आहे.











